उमेदीचे दोन शब्द

खर तर तरुणपणात असं वाटायचं आपलं एखादी पुस्तक प्रकाशित व्हावं,  वाचनाची आवड लहानपणापासूनच असल्यामुळे असे पुस्तकांचे स्वप्न पडणे स्वाभाविक आहे.  वाचनालयात जाऊन एखाद्या नवोदित लेखक लेखकाचे पुस्तक दिसले म्हणजे ते पुस्तक घरी नेण्या अगोदर त्या लेखकाने मनोगत कसे लिहिले आहे ? हे वाचू लागलो. आपले असेच एखादे पुस्तक प्रकाशित करायचे त्या दृष्टीने कथालेखन करू लागलो. महाराष्ट्रातील नामवंत दिवाळी अंकांमध्ये जसे - लोकमत, तरुण भारत, दैनिक सकाळ, विशाल विटा, दैनिक वास्तवता, कुजबुज, देशदूत इत्यादि दिवाळी अंकातून नियमित कथा प्रकाशित होऊ लागल्या. त्यात दैनिक सकाळ, दैनिक लोकमत, दैनिक तरुण भारत वगैरेंच्या कथा स्पर्धेमध्ये आमच्या कथांना प्रथम-द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार मिळाले. त्यामुळेच लिहीत राहण्याचा हुरूप वाढला. अगोदर विनोदी शैलीतील लिखाण करणारे आम्ही फक्त दिवाळी अंकासाठी लिखाण केले.  मात्र जसजसे लिखाण वाढू लागले तसतशी लिखाणीची जबाबदारी वाढू लागली.

कस्तुरी प्रकाशन प्रकशीत पुस्तके

उमेद (ग्रामिण कथा) कथासंग्रह साहित्य, सर्व पुस्तके Call & Order Now
कायी माय अहिराणी साहित्य Call & Order Now

ऑनलाइन दैनंदिन लेख